जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलाने सादर केलेल्या ‘अर्यमा उवाच’ या नाटकाने रसिकांची मने जिंकत उपविजेतेपद पटकावले.
महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयातर्फे नुकतीच वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नाट्य स्पर्धा पार पडली. स्पर्धेत सांघिक कार्यालयासह भांडूप, नाशिक, कोकण, कल्याण व जळगाव परिमंडलाने सहभाग घेतला. जळगाव परिमंडलातर्फे सोमनाथ नाईक यांनी लिहिलेल्या ‘अर्यमा उवाच’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. या नाटकास रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. या नाटकास स्पर्धेत उपविजेतेपद मिळाले.
या संघास मिळालेली पारितोषिके : सर्वोत्कृष्ट बालकलाकार (प्रथम) – पूर्वा जाधव, (द्वितीय) – समर्थ जाधव, रंगभूषा व वेशभूषा (प्रथम)- सागर सदावर्ते, संगीत (द्वितीय) – चेतन सोनार, प्रकाशयोजना (द्वितीय)- आशीष कासार, नेपथ्य (द्वितीय)- कमलेश भोळे, अभिनय (महिला) (प्रथम) – युगंधरा ओहोळ, अभिनय (पुरुष) (उत्तेजनार्थ) – शुभम सपकाळे, दिग्दर्शन (द्वितीय) – मयूर भंगाळे. या नाटकाची निर्मिती मुख्य अभियंता कैलास हुमणे यांची होती. उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरुण शेलकर हे व्यवस्थापक होते. या नाटकात संकेत राऊत, भावेश पाटील, पूनम थोरवे, युगंधरा ओहोळ, शुभम सपकाळे, मयूर भंगाळे, योगेश लांबोळे, सागर सदावर्ते, रवीकुमार परदेशी, पायस सावळे, श्वेतांबरी पाटील, मानसी माने, पूर्वा जाधव, प्रणिता शिंपी, समर्थ जाधव, भूषण तेलंग, महेश कोळी, सत्चित जोशी, कमलेश भोळे, रवींद्र चौधरी, किशोर मराठे, उमेश गोसावी, अक्षय पाटील, चेतन नागरे, विशाल आंधळे यांनी भूमिका साकारल्या.
या यशाबद्दल मुख्य अभियंता कैलास हुमणे, सहायक महाव्यवस्थापक नेमीलाल राठोड, कार्यकारी अभियंता राजेंद्र मार्के यांनी सर्व कलावंतांचे अभिनंदन केले आहे.