Home न्याय-निवाडा टायगर इज बॅक ! : सुषमा अंधारेंनी केले राऊतांच्या जामीनाचे स्वागत

टायगर इज बॅक ! : सुषमा अंधारेंनी केले राऊतांच्या जामीनाचे स्वागत

0
40

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांना मिळालेल्या जामीनाचे शिवसेना-उध्दव बाळासाहेब पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आपल्या स्टाईलने स्वागत केले आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयाने जामीन मंजूर केला. पत्रा चाळ घोटाळ्यातील संशयित म्हणून त्यांना सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने अटक केली होती. १०० दिवसांपासून ते कारागृहात होते. न्यायालयाने त्यांच्या जामीनावर निकाल राखून ठेवला होता. आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. यातच पक्षाच्या फायरब्रँड नेत्या तथ्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करून त्यांनी स्वागत केले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये ‘टायगर इज बॅक’ ! असे म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी राऊतांच्या अटकेचे आपल्या स्टाईलने स्वागत केले आहे.

तर, दुसरीकडे ईडीने न्यायालयाच्या या निकालाला स्थगिती मिळावी अशी मागणी उच्च न्यायालयात केली आहे. यावर आजच दुपारी निर्णय घेण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound