Home धर्म-समाज पाचोऱ्यात प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायतीची संयुक्त बैठक

पाचोऱ्यात प्रवासी महासंघ व ग्राहक पंचायतीची संयुक्त बैठक


 

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील हुतात्मा स्मारक रविवारी महाराष्ट्र प्रदेश प्रवाशी महासंघ, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अंतर्गत संयुक्तरित्या महत्वपूर्ण बैठक नाशिक विभागीय संघटक संजय शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

या बैठकीस विभागीय सचिव प्रा.डॉ. आत्माराम महाजन, जिल्हाध्यक्ष मनोज जैन, जिल्हा संघटक राजेंद्र शिंपी, तालुका अध्यक्ष शांताराम चौधरी, तालुका उपाध्यक्ष अनिल (आबा) येवले, जिल्हा कार्यकारी संघटक प्रा. वैशाली बोरकर, जिल्हा सदस्य मनिषा पाटील, नयना शेंडे, नंदकुमार शेलकर, राहुल महाजन, दिलीप पाटील सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीत २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करणे, ग्राहक चळवळ सामान्य नागरिक पर्यंत पोहचविणे, चोपडा या ठिकाणी एक दिवशी अभ्यासिकेचे आयोजन करणे त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यातील ग्राहक संरक्षण समितीवर चार नावे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे पाठवणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीचे सूत्रसंचलन शांताराम चौधरी यांनी केले. तर बैठकीस उपस्थितांचे आभार राजेंद्र शिंपी यांनी मानले.


Protected Content

Play sound