जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | मुळजी जेठा महाविद्यालयाच्या एकलव्य क्रीडा संकुलाच्या मागे असलेल्या रस्त्यावर अज्ञात चोरट्याने महिलेच्या हातातून २७ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लीना वासुदेव चौधरी (वय-52, रा. आराधना कॉलनी, नवीन पोस्टल कॉलनी, जळगव ) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. गुरुवार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉक करण्यासाठी पायी जात असताना मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मागे असलेल्या एकलव्य क्रीडा संकुलाजवळ अज्ञात एका चोरट्याने त्यांच्या हातातील २७ हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना समोर आली आहे.
या संदर्भात लीना चौधरी यांनी शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहे.