अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा 1995 -96 एस.एस.सी बॅचचा स्नेहमेळावा श्री क्षेत्र कपिलेश्वर महादेव मंदिरावर नैसर्गिक वातावरणात नुकताच संपन्न झाला.
सन १९९५-९६ दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्यासाठी गावातील तसेच बाहेर गावी असलेले, आजी माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी तब्बल २६ वर्षांनंतर दिवाळीच्या सुट्टीत वेळ काढून एकत्र आले. राज्यातील तसेंच राज्याबाहेर नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले सुमारे ७० विद्यार्थी तसेच ५०च्या जवळपास विद्यार्थीनिनी “गेट टूगेदर”या कार्यक्रमात हजेरी लावली.
गुरू व शिष्य दिवाळी निमित्ताने एकत्र आल्याने हा स्नेहमेळावा पार पडला. सदरील कार्यक्रम श्री क्षेत्र कपिलेश्वर या धार्मिक व पर्यटनस्थळी निसर्गरम्य वातावरणात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य जी. आर.चौधरी हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक तसेच गुरुजन वर्ग होते. माजी प्राचार्य चौधरी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. दिपप्रज्वलना नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यात शिक्षक तसेच चांगल्या हुद्द्यावर असणारे विद्यार्थी विद्यार्थिनींचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला.
सत्कारानंतर माजी विद्यार्थ्यांकडून आजी माजी शिक्षक यांना सन्मानित करून ऋननिर्देश दिले. यानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेविषयी एकेक किस्से, हास्य कल्लोळ सांगत आपल्या भावनाना वाट मोकळी करून देत मनोगत व्यक्त केले. व आपल्या गुरुजनाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यामुळे सर्व शिक्षक स्टॉप त्यांचा या अनोख्या सत्काराने भारावून गेले. कळमसरे येथील व सद्या नोकरीनिमित्त नाशिक येथे स्थायिक असलेले नरेंद्र गणेश चौधरी यांनी उपस्थित शिक्षक व सर्वच मित्र मैत्रिणी यांना आठवण म्हणून श्रींची(गणपती)चांदीची सुबक व आकर्षक मूर्ती भेटवस्तू म्हणून दिली. सदरील स्नेहमेळावा कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवेंद्र राजपूत, सुदाम कोळी, प्रशांत राजपूत, प्रदीप पाटील, नंदू शर्मा, नरेंद्र चौधरी, नाना महाजन, शिक्षक डी.डी. राजपूत, सूर्यवंशी मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राखी पतील यांनी तर सूत्रसंचालन व्ही पी महाजन यांनी केले.
आजारातून जीवदान मिळालेल्या मित्राला आर्थिक मदत
आपल्या च बॅच मधील एक मित्र एका दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याची माहिती मैत्रिणींना मिळाली. आणि थेट किशोर माळी याचे घर गाठून त्याची विचारपूस करीत त्यास ५ हजार रुपयांची आथिर्क मदत केली. मैत्रिणींच्या या अचानक भेटीने किशोर व त्याचे कटुंब भारावून गेले होते.