जळगाव (प्रतिनिधी) टोकरे कोळी , कोळी महादेव, कोळी मल्हार जमातींच्या तरुणांना जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून अॅड. गणेश सोनवणे व नरेश शिरसाठ यांनी पुढाकार घेतला आहे. सदर चळवळ महाराष्ट्र भर चालवणार असून जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एकप्रकारे महामोहीमच सुरु केल्याचे त्यांनी कळविले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, टोकरे कोळी समाजास जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणी येतात. जातप्रमाणपत्रासाठी कोणते कागदपत्र लावावे यासाठी शासनस्तरावरुन वेळोवेळी वेगवेगळे शासन निर्णय पारीत झालेले आहेत. यासर्व बाबींचा अभ्यास करुन अॅड.गणेश सोनवणे व नरेश शिरसाठ यांनी टोकरे कोळी जमातीची प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी महामोहीम सुरु केलेली आहे. पहिल्या टप्प्यात किमान 5000 प्रमाणपत्र मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी टोकरे कोळी बांधवांना जात प्रमाणपत्र अर्ज कसा भरावा, कोणती कागदपत्र जोडावी, यासाठी प्रत्येक तालुक्यावर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे अॅड गणेश सोनवणेंनी सांगीतले. सदर योजनेचा शुभारंभ दि 2 जून रोजी सेवानिवृत्त विभागीय अधिकारी भागवत सैंदाणे यांच्या हस्ते महर्षी वाल्मिक नगर येथे होणार आहे. तरी ज्या बांधवांना प्रमाणपत्र काढायचे त्यांनी अॅड. गणेश सोनवणे यांना 9370702748 या मोबाईल क्रामांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.