Home क्राईम कुसूंबा येथील विद्यार्थी बेपत्ता झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद

कुसूंबा येथील विद्यार्थी बेपत्ता झाल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात नोंद

0
40

 

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील कूसूंबा येथून १९ वर्षीय विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी शुक्रवार, २८ ऑक्टोंबर रोजी एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

कूसंबा येथे राहत असलेला तरुण हितेश दिपक पाटील हा शिक्षण घेत आहे. २८ ऑक्टोंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घरात कुणाला काही एक न सांगता, हितेश कोठेतरी निघून गेला, पून्हा परतला नाही, सर्वत्र शोध घेवूनही तो मिळून न आल्याने हितेश याचे वडील दिपक रामचंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात खबर दिली असून त्यावरुन बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. उंची पाच फूट, शरीराने मजबूत, अंगात काळे रंगाचे टी शर्ट, काळी जिन्स, पॅन्ट असे हितेश याचे वर्णन आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी हे करीत आहेत.


Protected Content

Play sound