अमळनेर (प्रतिनिधी) येथील पूज्य सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे 25 मे व 26 मे 2019 रोजी असे दोन दिवस ‘शेअर मार्केटमध्ये करिअर’ या विषयावर मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते.
मार्गदर्शक उदय पाटील (युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अमळनेर) यांनी याविषयावर संपूर्ण दोन दिवस अतिशय अप्रतिम व अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त इतर ही क्षेत्रात आपल्याला करीयर करता येऊ शकते हा आत्मविश्वास त्यांनी तरुणांना दिला. या दोन दिवसाच्या सेमिनार मध्ये शेअर मार्केट मधील संधी व धोके, शेअर मार्केट मधील सामान्य संकल्पना या स्पष्ट केल्या. तसेच सामान्य जनतेत शेअर मार्केट विषयी असणाऱ्या संकल्पना ह्या कश्या चुकीच्या आहेत हे स्पष्ट करून दाखवले.
साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा. विजयसिंग पवार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की “हेच सेमिनार एखाद्या मोठया शहरात आयोजित केले असते तर हजारो रुपये फी सरांना मिळाली असती.हे व्याख्यान ऐकणारे सर्वचजण अचंबित झाले आहेत.परंतु याठिकाणी सरानी मोफत मार्गदर्शन केले.त्याबद्दल सरांचे विशेष आभार व्यक्त केले. युनियन बँकेचे सहकारी श्री देसले साहेब व प्रशांत पाटील यांनी कार्यशाळेचे प्रायोजकत्व स्वीकारले होते. तसेच युनियन बँकेचे शाखा प्रबंधक मयूर पाटील व त्यांच्या टीमचे सहकार्य मिळाले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सतीश कागणे, सोपान भवरे, स्वप्नील वानखेडे, जयेश काटे, शरद पाटील, अनिल पाटील, नरेंद्र पाटील ,उमेश काटे, एम आर पाटील, सागर साळी व वाचनालयाचे संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांचे सहकार्य लाभले. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी प्रेक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. भविष्यात तरुणांनी अशा नवनवीन वाटा शोधून आपले करिअर करावे अश्या सदिच्छा प्रा.विजय सिंग पवार यांनी व्यक्त केल्या.