जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा पुरवठा विभागाने अमळनेर तालुक्यातील सात्री येथे एकाच परिवाराला सहा रेशन दुकान देण्यात आले असून दुकानांचा परवाना देतांना भ्रष्टाचार झाला आहे. याची चौकशी करून संबंधित रेशन दुकानांचा परवाना रद्द करून संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांना निलंबित करण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता छत्रपती शिवाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील सात्री गावात महेंद्र बोरसे यांना जिल्हा पुरवठा प्रशासनाने विविध महिला बचत गटाच्या नावाने तब्बल सहा दुकाने देण्यात आली आहे. एकाच परिवारात सदर दुकाने देण्यात आले असून महेंद्र बोरसे यांना २००६ मध्ये छत्रपती शिवाजी मंडळाच्या नावे सात्री येथील स्वस्त धान्य दुकान मिळालेले असतांना त्याला जोड दुकाने दिलेली दिसून आली आहे. शासनाकडे खोटी प्रतिज्ञापत्र देवून परवाने घेतले आहे. जिल्हापुरवठा अधिकारी यांनी भ्रष्टाचार करून याच पध्दतीने जिल्ह्यातही इतर ठिकाणी खैरात वाटली आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करण्यात यावी, संबंधित रेशन दुकानाचा परवाना सील करण्यात यावी, परवाना काळातील अफरातफरीची चौकशी करावी, आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांची तात्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे, महानगराध्यक्ष किरण बोरसे यांनी केली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/519315599631398