यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील महेलखेडी येथे एस.टी.बसखाली आल्यामुळे मृत पावलेल्या चिरमुडीच्या कुंटुबास एस.टी.परिवहन महामंडळाच्या वतीने नुकतीच दहा हजार रुपयाची मदत देण्यात आली.
या संदर्भातअधिक असे की, महेलखेडी तालुका यावल येथे दिनांक २४ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास महेलखेडी बसथांब्याजवळ अपघात झाला होता. त्यात एरंडोल तालुक्यातील खेडी-कढोली या गावातील चार वर्षीय रागीनी समाधान मरसाळे ही जागीच मरण पावली होती. या घटनेची तात्काळ दखल घेत यावल एसटी आगाराचे प्रभारी व्यवस्थापक एस.व्ही. भालेराव व त्यांच्या सोबत सहाय्यक वाहतुक अधिक्षक जी. पी.जंजाळ, आगार वाहतुक वरीष्ठ लिपीक जे.एम. कुरमभट्टी आणि यावल आगाराचे सहाय्यक वाहतुक निरीक्षक के.बी. तडवी यांनी रागीनी मरसाळे हिच्या नातेवाईकांच्या घरी जावुन त्यांचे सांत्वन केले. यावेळी एस.टी. परिवाहन महामंडळाच्या माध्यमातुन दिली जाणारी तात्काळ मदतीचे दहा हजार रुपयांचे धनादेश मयताची नातेवाईक सुरेखा निकाळजे यांच्या सुपुर्द करण्यात आला. यावेळी कोरपावलीच्या सरपंच मानिषा अकील तडवी व ग्रामस्थ उपास्थित होते.