जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मेस्को माता नगरातील खळवाडीतून शेतकऱ्याच्या मालकीच्या लोखंडी दरवाजा आणि खिडकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मंगळवारी १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश अमृत पाटील (वय-६२) रा. रामपेठ, पाटीलवाडा, जुने जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांचे मेस्कोमाता नगरात गटनंबर ११२ मध्ये खळवाडी आहे. या ठिकाणी त्यांचे काही सामान ठेवलेले आहेत. दरम्यान, त्यांच्या खळवाडीतून ९ हजार २०० रूपये किंमतीचे लोखंडी दरवाजा आणि खिडकी ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता समोर आले. त्यांनी आजूबाजूला सर्वत्र चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. अखेर सायंकाळी ६ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहे.