जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नात हुंडा कमी दिला म्हणून अयोध्या नगरातील माहेर आलेल्या विवाहितेला मारहाण, शिवीगाळ करून पैशांची मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील अयोध्या नगरातील माहेर आलेल्या निलीमा ललीत इंगळे (वय-३६) यांचा विवाह जामनेर येथील ललित मधुकर इंगळे यांच्याशी २०१९ मध्ये रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर विवाहिता सासरी नांदत असतांना पती ललीत इंगळे याने विवाहितेच्या आईवडीलांनी लग्नात हुंडा कमी दिला म्हणून शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच माहेरहून हुंड्यापोटी अजून रक्कम घेवून ये अशी मागणी केली. दरम्यान, पतीसह विवाहितेला तिची सासू, सासरे, नणंद यांनी पैशांचा तगादा लावाला. या तगाद्याला वैतागून विवाहिता आयोध्यानगरात माहेरी निघून आल्या. सोमवारी १० ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पती ललीत मधुकर इंगळे, सासू शोभा मधूकर इंगळे, सासरे मधुकर कडू इंगळे सर्व रा. जामनेर आणि नणंद कविता गणेश देठे रा. पुणे या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राजपूत करीत आहे.