यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील आदिवासी व त्या पाड्यावर नागरीकांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने व प्रशासनास वारंवार निवेदन देऊन ही या मूलभूत सुविधा पुरविल्या जात नसल्याने निळे निशाण संघटनेच्या वतीने, संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली येथील पंचायत समिती, कार्यालयासमोर धरणे आंदोलने करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
तालुक्यातील विविध गावांमध्ये अनु. जाती – जमातीचे लोक मोठ्या प्रमाणात अतिदुर्गम क्षेत्रात वास्तव्यास आहेत. आज देखील ते पुर्णपणे शासनाकडून मिळत असलेल्या सुख – सुविधेपासून तसेच जिवनावश्यक मुलभूत गरजांपासून वंचित आहे. यासंदर्भात प्रशासनाला वारंवार समस्यांचे लेखी स्वरूपात निवेदन निळे निशाण संघटनेच्या वतीने देऊन ही समस्यांचे समाधानकारक निवारण होत नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आज दि. ७ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे यावल शहराच्या प्रमुख मार्गावरीत वाहतुक विस्कळीत झाली होती . यावेळी संघटनेच्या वतीने निवेदनात चारमळी टेंभीगुरन आसराबारी पाडा, सांगवी बुद्रुक, येथील समस्यांचा समावेश आहे. त्यात पिण्यांचे पाण्याची व्यवस्था , गावाअंतर्गत रस्ते , गावात लाईटाची व्यवस्था , आदिवासी पाडयांवरील शाळा सुरळीत चालू असणे, चारमळी येथे अंगणवाडीची मागणी तसेच अनियमित शिक्षकांवर कारवाई आदी मागण्यांचा समावेश आहे . या आंदोलकांना गटविकास अधिकारी यांच्या वतीने कक्ष अधिकारी जी. एम . रिंधे यांनी शिक्षण विस्तार अधिकारी विश्वनाथ धनके यांच्या उपस्थितीत समस्या सोडविण्याचे लेखी पत्र दिल्यानंतर संघटनेचे आंदोलन मागे घेण्यात आले .
याप्रसंगी संघटनेचे सदाशिव निकम , नंदा बाविस्कर, युवराज सोनवणे, अशोक तायडे, लक्ष्मी मेढे, तालुका युवक अध्यक्ष विलास तायडे, ज्योती कुरकुरे, सैय्यद सखावत, दिपक मेढे, राहुल तायडे, जितेंद्र मेढे, सिकाऱ्या पावरा, मिलिंद सोनवणे, सुनिल बारेला, देविदास बारेला, दिपक मेढे, नितिन कोलते यांचेसह असंख्य महिला – पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.