Home Cities जामनेर खडकी येथे मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

खडकी येथे मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

0
30


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील खडकी आणि बोरगाव येथे जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे भूमीपूजन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते नुकतेच करण्यात आली.

जामनेर तालुक्यातील खडकी गावासह बोरगाव या गावाला जलजीवन योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेसाठी ५ कोटी निधी मंजूर झाला असून सदर योजनेचा भूमिपूजन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच मंत्री महाजन यांच्याहस्ते विविध कामाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी जि. प. सदस्य विलास पाटील, प्रसाद नाईक, राजमल भागवत, आनंदा लावरे, अशोक पाटील, किशोर नाईक, उदल नाईक, रामकिशन नाईक, के.बी. पाटील, भाईदास चव्हाण, बाळू चव्हाण यांच्यासह अधिकारी, खडकी गावचे ग्रामपंचायत सदस्य, भाजपा कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound