Home Cities धरणगाव गुलाबराव वाघ याचा अध्यक्षतेखाली शिवसैनिकांची बैठक संपन्न

गुलाबराव वाघ याचा अध्यक्षतेखाली शिवसैनिकांची बैठक संपन्न

0
33

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील साने पटांगणावर शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ याचा अध्यक्षतेखाली शिवसैनिक याची बैठक संपन्न झाली यांत सोमवार, दि. ५ रोजी होणारा दसरा मेळावा संदर्भात चर्चा झाली. यावेळी धरणगाव शहरातील हजारो शिवसैनिक मेळाव्यास येणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना पदाधिकारी यांनी वाघ यांना सांगितले. त्या संदर्भात नियोजन करण्यात आले.

यावेळी धरणगाव शहरतील उद्योगपती व माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, फिरोज पटेल अँड शरद माळी धिरेंद्र पुरभे बापू महाजन नगरसेवक भागवत चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले तसेच माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी यांनी ‘साम, दाम, दंड आपण पक्ष वाढीसाठी लावू, परंतु गद्दारीचा शिक्का लावणार नाही.’ असे मत व्यक्त केले.

गुलाबराव वाघ यांनी “यावेळी चा दसरा मेळावा हा ऐतिहासिक असून निष्ठेचा मेळावा होणार आहे. खोक्याच्या आमिषाला बळी न पडता बाळासाहेब ठाकरेचा शिवसेनाच्या मेळाव्याचे साक्षीदार व्हा, कोणाचाही भूल थापांना बळी पडू नका. ठाकरे घरण्यांवर जर कोणी अपशब्द बोलले तर त्याला रस्त्यात तुडवू.” असा इशारा वाघ यांनी विरोधकांना दिला.

यावेळी संघटना वाढीसाठी रिक्त पदांवर नवीन पदाधिकारी व इच्छुकांची नावे घेण्यात आली व नवीन नियुक्ती लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन किरण अग्निहोत्री यांनी केले तर आभार कार्यालय प्रमुख विनोद रोकडे यांनी मानले.


Protected Content

Play sound