Home Cities जामनेर ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ अभियानांतर्गत नागरीकांच्या समस्येवर चर्चा

‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ अभियानांतर्गत नागरीकांच्या समस्येवर चर्चा

0
35

शेंदुर्णी – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जळगांव जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांचे आदेशानुसार जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी – नाचणखेडा जिल्हा परिषद गटात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या अभियान अंतर्गत महिन्याच्या पहिल्या शनिवारी जामनेर तालुका राष्ट्रवादीचे नेते संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वात बैठक संपन्न झाली.

केंद्रातील भाजपा सरकारच्या महागाई कमी करण्याच्या, रोजगार उपलब्धता, शेतकरी विरोधातील योजनां मधील अपयशाचा पाढा वाचून सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांच्या समस्यांबद्दल विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबविलेल्या विविध लोक हितकारी योजनांची माहिती देण्यात आली.

संजय गरुड यांनी कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर आघाडी सरकारच्या काळातील मंजूर विकास कामांना होत असलेल्या विलंबाबाबत कामे मार्गी लावण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या प्रसंगी शेंदुर्णी – नाचणखेडा गटातील सुमारे ७० कार्यकर्ते उपस्थित होते.


Protected Content

Play sound