रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महिलेचा पदर ओढून विनयभंग करून अश्लिल शिवीगाळ करत मी जेलमधून सुटून आल्यावर पहिले तुझा खून करीन अशी धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार रावेर तालुक्यातील निंभोरा येथे घडला आहे. याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, निंभोरा गावात २४ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार २९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता गावातील एका दुकानात महिला मुलासाठी बिस्कीट घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी गावातील महादू उर्फ महादेव सिताराम महाले हा येवून महिलेचा पदर ओढून तिचा गळा पकडला. तिच्याशी अंगलट करून अश्लिल शिवीगाळ करत म्हणाला की, मी जेलमधून सुटून आल्यावर पहिले तुझा खून करीन अशी धमकी दिली. याप्रकरणी महिलेने निंभोरा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी महादू उर्फ महादेव सिताराम महाले याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील करीत आहे.