जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २० लाख रूपयांची मागणी करत विवाहितेला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हिराशिवा कॉलनीतील माहेर असलेल्या नेहा परेश सोनवणे (वय-२२) यांचा विवाह पुणे येथील परेश मनोहर सोनवणे यांच्याशी रितीरिवाजानुसार २०२१ मध्ये झाला. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर विवाहिता किरकोळ कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरूवात झाली. त्यानंतर घराचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २० लाख रूपयांची मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिचा शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली. तसेच सासरे, सासू, दीर यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. हा त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान विवाहितेने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता पती परेश मनोहर सोनवणे, सासरे मनोहर आत्माराम सोनवणे, सासून शर्मीला मनोहर सोनवणे आणि दीर यश मनोहर सोनवणे सर्व रा. पुणे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गुलाब माळी करीत आहे.