महावितरण कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात द्वारसभा व निदर्शने

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  पाचोरा विभागातील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनतर्फे  विविध प्रलंबित मागण्यांसाठी महावितरण विभागीय कार्यालयासमोर द्वारसभा घेवून जोरदार निदर्शने करण्यात आली.

 

महावितरणमधील विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे केंद्रीय सरचिटणीस देवकांत यांनी महावितरण व्यवस्थापनास कर्मचार्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करुन देखील योग्य ती कार्यवाही केली जात नसल्याने नाईलाजास्तव  दि. १६ सप्टेंबर रोजी संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विभागीय कार्यालयासमोर द्वारसभा व निदर्शने घेण्याचे निर्देश देण्यात आले होते.  त्या अनुषंगाने महावितरण विभागीय कार्यालयासमोर द्वारसभा व निदर्शने करण्यात आली.  तसेच दि. २१ सप्टेंबर रोजी आझाद मैदान, मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. याधरणे आंदोलनात सर्व कर्मचार्‍यांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन देखील यावेळी पदाधिकार्‍यांकडून  करण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे झोन उपाध्यक्ष आर. आर. पाटील, सर्कल संघटक रुपेश चव्हाण, विभागीय सचिव किशोर पाटील, सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता नंदलाल बोदडे पदाधिकार्‍यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार जितेंद्र माळी यांनी मानले. द्वारसभेला बहुसंख्येने विज कर्मचारी हजर होते.

 

Protected Content