मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अतिशय अक्षेपार्ह वक्तव्य केल्याची ऑडियो क्लिप व्हायरल होताच क्लिप मधील संभाषणवरून जिल्हाभरातील मराठा समाज प्रचंड आक्रमक झाला असून ठीक ठिकाणी निवेदन दिली जात आहे. मुक्ताईनगर तालुका मराठा समाजातर्फे निवेदन देवून जातीयवादी बकाले यास तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली असून कारवाईत दिरंगाई झाल्यास प्रचंड आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पोलीस दलातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या (एल.सी.बी.) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अतिशय घाणेरड्या, अक्षेपार्ह वक्तव्य केलेले असून त्याबाबतची दि. १३/०९/२०२२ रोजीची ऑडीओ क्लिप व्हायरल झालेली असून एक पोलीस निरीक्षकाने अशा महत्त्वाच्या व प्रतिष्ठेच्या पदावर नियुक्त असतांना एखाद्या समाजाबद्दल बेताल वक्तव्य करुन संपूर्ण समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. तरी एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याच्या मनात जर एखाद्या समाजाबद्दल इतका द्वेष, राग राहत असेल तर अशा अधिकाऱ्यांकडून सामाजिक न्यायाची. सुव्यवस्थेची काय अपेक्षा करता येईल.
एवढ्या मोठ्या पदावरील जबाबदार व्यक्तीकडून समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करुन कायद्याची स्वतः पायमल्लीच केलेली असून आपल्या पदाचा दुरुपयोग केलेला आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांकडून जो एखाद्या समाजाच्या विरोधात आहे, त्याकडून सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रिद वाक्याची पुर्तता होणे शक्य नाही. तरी सदर पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे पोलीस म्हणून जिथे कुठे कार्य करतील, तिथे मराठा समाजाबद्दल त्यांच्या आकस, द्वेष कायम राहील. म्हणून अशा पोलीस अधिकाऱ्यांची फक्त बदली करून काहीही होणार नाही. तरी पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाल यांना व त्यांना समर्थन देणारे अशोक महाजन यांना त्वरीत निलंबन करण्यात येऊन कायमस्वरुपी सेवेतून” बडतर्फ” करण्यात येवून त्यांचे विरुद्ध सामाजिक भावना दुखाविल्याबाबत व महाराष्ट्र नागरी सेवा कायद्यातील नियम, अटी व शर्तीचा भंग केला असल्याने त्यांचेविरुध्द गुन्हा दाखल करुन कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आलेली आहे.
“मुळात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) जळगाव येथे अनुभवी व सेवा जेष्ठते नुसार पोलिस निरीक्षक पदाची होत असते परंतु या ठिकाणी कुठलाही अनुभव नसलेले बकाले यांची नियुक्ती कोणाच्या शिफारशी वरून झाली होती असा खडा सवाल उपस्थित करीत याप्रकरणी बकाले यांचेवर बडतर्फ व शिस्त भांगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले”
यावेळी निवेदन देतेवेळी आमदार चंद्रकांत पाटील, मराठा समाज तालुका अध्यक्ष अनंतराव देशमुख, दिनेश कदम, संदीप बागुल, नरेंद्र गावंडे, दिलीप पाटील ( चोपडे), प्रफुल्ल पाटील, गणेश पाटील, ललित बाविस्कर, अविनाश बोरसे,साहेबराव पाटील,रमेश पाटील,किशोर पाटील,शिवाजी मराठे,गणेश पाटील,किरण महाजन, नगरसेवक संतोष मराठे , रविंद्र चव्हाण, राहुल शेळके, प्रदीप दांडगे, ad नीरज पाटील, जितेंद्र पाटील,चंद्रकांत मराठे निलेश पाटील,रोशन थोरात, दीपक कांदेले, सोपान मराठे, सचिन पाटील आदींसह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते.
ह्याच बरोबर शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आले असून निवेदन देतेवेळी आमदार चंद्रकांत पाटील, तालुका प्रमुख छोटू भोई,सुनील पाटील, अफसर खान,राजेंद्र तळेले, नगरसेवक मुकेश वानखेडे, आरिफ आझाद, युनूस खान, बबलू कोळी, पियूष मोरे, वसंत भलभले, संतोष मराठे , राजेंद्र हिवराळे, निलेश शिरसाट , संदीप पाटील आदींसह असंख्य शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.