यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नि:शुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत यावल येथे संपन्न झाले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रय फाउंडेशन यावलच्या वतीने निशुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराचे आयोजन जनसेवा मल्टीस्पेहालिटी हॉस्पिटल यावल येथे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष तथा युवा समाजसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या माध्यमातुन करण्यात आले होते.
या मोफत नेत्रतपासणी शिबीर या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे होते तर शिबीराचे शुभारंभ आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पहर अर्पण करून पुजन करण्यात येवुन कार्यक्रमाचे सुरूवात करण्यात आली.
यावेळी शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली व ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना शस्त्रक्रीयेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. इतर रुग्णांना तपासणी करून आपल्या डोळयांची काळजी घेण्याबाबत योग्य सल्ला व मार्गदर्शन नेत्रचिकित्सकांच्या वतीने देण्यात आले.
या शिबीरात सहभागी नेत्ररूग्णांची आश्रय फाऊंडेशन व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली आहे. या मोफत नेत्रतपासणी शिबिरात एकूण १०५ नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली व यातील ११ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले.
सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ गौरव शिंदे, डॉ. जॅकी शेख, विनोद पाटील यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली.
याप्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष उमेश फेगडे आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, हेमराज फेगडे, डॉ. योगेश चौधरी, उज्वल कानडे, पवन सुशील, डॉ. प्रवीण पाटील, आदींची उपस्थिती होती.
या शिबिरास यशस्वी करण्यासाठी आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर लोहार, मनोज बारी, विशाल बारी, रितेश बारी, आश्रय फाउंडेशन व जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सर्व कर्मचारी आदींनी महत्वाचे परिश्रम घेतले.