Home राजकीय पहिली फेरीत रक्षाताई खडसे आघाडीवर

पहिली फेरीत रक्षाताई खडसे आघाडीवर


rakshatai khadse

जळगाव प्रतिनिधी । रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे या पहिल्या फेरीनंतर आघाडीवर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांना उमेदवारी दिली होती. त्या भाजप, शिवसेना, रिपाइं (आठवले गट), रासप व मित्रपक्षांच्या महायुतीच्या उमेदवार होत्या. तर राष्ट्रवादीने येथे उमेदवारी देण्यासाठी बराच काथ्याकुट केला. अखेर अगदी निर्णायक टप्प्यात हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात येऊन येथून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे महायुतीच्या रक्षाताई खडसे तर महाआघाडीचे डॉ. उल्हास पाटील यांच्यात लढत झाली.

 

दरम्यान, आज सकाळी जळगाव येथील शासकीय गोदाम परिसरात मतमोजणी सुरू झाली. यात पहिल्या फेरीअखेर महायुतीच्या रक्षाताई खडसे यांनी 22374 मतांची आघाडी घेतली आहे. काँग्रेस महाआघाडीचे डॉ. उल्हास पाटील 11033रावेर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी एकूण २३ फेर्‍या होणार असून अधिकृत निकाल हा सायंकाळी उशीरा जाहीर होण्याची शक्यता आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound