Home Cities जामनेर जामनेर पुरा भागात गटार बांधकामाचे भूमिपूजन

जामनेर पुरा भागात गटार बांधकामाचे भूमिपूजन

0
44

जामनेर  – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पुरा भागातील हिंदू खाटीक समाज मंगल कार्यालय परिसरामध्ये सांडपाणी गटार बांधकामाचे भूमिपूजन लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन व उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले.

जामनेर नगरपालिकेच्या निधीतून पुरा भागातील हिंदू खाटीक समाज मंगल कार्यालय परिसर व कॉलनी भागामध्ये सांडपाणी गटार बांधकामाचे भूमिपूजन व हिंदू खाटीक समाज मंगल कार्यालय आवारामध्ये वृक्षारोपण नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, नगरसेवक बाबुराव हिवराळे, कैलास नरवाडे, सुहास पाटील, जयेश पाटील, अनिस शेख, रतन गायकवाड, रिजवान शेख, नाजिम पार्टी, उल्हास पाटील, दत्तू सोनवणे यांच्यासह रवींद्र झालटे, कैलास पालवे, विजय शिरसाट, विलास हिवराळे, सुभाष पवार, खाटीक समाज बांधव, सुनील कलाल, संजू कल्याणकर, डिगंबर भोकरे, गोकुळ कल्याणकर, बंटी कल्याणकर, राजीव धन यांच्यासह नागरिक व पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound