अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कपिलेश्वर मंदिराची जागा बळविण्याचा प्रयत्न सुरु असून हे काम पोलीस बंदोबस्तात तत्काळ बंद करण्यात यावं अशी कपिलेश्वर मंदिर ट्रस्टची मागणी करत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
शिवाजी हिलाल वाकडे मुडावत तालुका शिंदखेडा हे कपिलेश्वर मंदिरावर आशापुरी माता मंदिरास अनधिकृत तार कंपाऊंडकरून जागा बळविण्याचा प्रयत्न सुरु असून सदर काम पोलीस बंदोबस्तात तत्काळ बंद करण्यात यावं अन्यथा कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आला आहे.
या निवेदनात, “श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिराची जागेवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न सुरु असून याची चौकशी नाशिक विभागीय महसूल कार्यालयात सुरू आहे. मुडावर येथील वाकडे परिवार आणि अधिकृत या जागेवर कंपाऊंड घालून अतिक्रमण करत असून त्यांना बोलायला गेल्यावर हमरीतुमरीची भाषा करतात. आम्ही शासकीय स्वच्छतागृह बांधलं असून त्याचा रस्ता या लोकांनी दादागिरीने बंद केलेला आहे. आता तारेची कंपाऊंड करत असून आम्ही यापूर्वी तक्रार दाखल केली. मात्र याची दखल घेतली नाही. तरी सदर काम पोलीस बंदोबस्तात्काळ बंद करण्यात यावं.” अशी मागणी करण्यात आली असून “अन्यथा कार्यालयासमोर भजन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.” असा इशारा श्री क्षेत्र कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात आला आहे.