सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | सेवा निवृत्तीच्या दिवशी सैनिक भावाने शहीद सैनिक भावाला श्रद्धांजली अर्पण करण्याचा सावदा रेल्वे स्टेशन गाते येथे हृदय स्पर्शी कार्यक्रम पार पडला.
भारतीय सैन्यातून निवृत्त होऊन मुंबई पोलिस दलात सिलेक्ट झालेल्या किरण तायडे यांचे 4 वर्षापूर्वी अपघाती निधन झाले. त्यांचे मोठे बंधू भारत तायडे हे नुकतेच सैन्य दलातून निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभात स्व. किरण तायडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येऊन स्मृतींना उजाळा देण्यात आला. विशेष म्हणजे या परिवारातील सर्व भावंडं हे भारतीय सैन्य दलात आहेत. यश सिध्दी सैनिक संघ व यश सिध्दी सैनिक संघ खान्देश व महार रेजिमेंटचे सर्व आजी व माजी सैनिकांच्या वतीने किरण तायडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी समाज भूषण अरूण वानखेडे, यश सिध्दी सैनिक संस्थापक अनिल डोगरदीवे, सुधाकर तायडे, विदर्भ प्रमुख कैलास खिल्लारे, ऑ सुभेदार तायडे, वरणगाव नगराध्यक्ष सुधीर काळे, आरपीआय आठवले गटाचे राजु सुर्यवंशी, युवा भिम क्रांतीचे अध्यक्ष सागर बाविस्कर व सर्व गावकरी यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.