जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील सिंधी कॉलनी परिसरात गणेश उत्सव आगमन मिरणुकीत गर्दीत ज्वालाग्राही ‘स्प्रे’ हवेत मारुन आगीचा लोळ निर्माण करुन स्टंटबाजी करणाऱ्या तिघांविरुद्ध शुक्रवार, २ सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसात दाखल तक्रारीनुसार असे की, ३१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास शहरातील सिंधी कॉलनीत चौकात ज्वालाग्राही ‘स्प्रे’ हवेत मारुन आगीचा लोळ निर्माण करण्यात येत होते. वास्तविक बघता ‘हिट स्प्रे’ हा ज्वालाग्रही व स्फोटक पदार्थ हा घरघुती किटक नाशक म्हणुन वापराकरीता आहे. परंतू, त्याचा गणेश उत्सव आगमन मिरणुकीत गर्दीत व सार्वजनिक ठिकाणी तो ज्वालाग्राही “स्प्रे” हवेत मारुन आगीचा लोळ निर्माण करुन समीर विनोदकुमार केसवानी (वय २१, रा. गणपती नगर), जयदेव श्रवणकुमार केसवानी (वय २१, रा. आदर्श नगर) आणि एका अल्पवयीन मुलगा अशा तिघांनी स्टंटबाजी केली. यामुळे मिरवणुकीतील लोकांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील यांच्या फिर्यादीवरुन समीर विनोदकुमार केसवानी , जयदेव श्रवणकुमार केसवानी आणि एका अल्पवयीन मुलगा या तिघांविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार पुरुषोत्तम वाघळे हे करीत असून संशयितांना सीआरपीसी कलम ४१ (अ) (१) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे.