यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राज्य सरकारचा निषेध

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यावल तालुका शाखेच्या वतीने राज्य सरकार व केंद्र सरकारचा निषेध करत महागाईच्या विरोधात यावल तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

राज्य सरकार व केंद्र सरकारच्या विरोधात उपहासात्मक घोषणा देत ५० खोके एकदम ओके म्हणत प्रत्यक्षात खोक्यांवर नकली नोटा चिपकवलेल्या खोके घेऊन निदर्शने करण्यात आली.

यावल तहसीदार महेश पवार यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या आपल्या नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात चालू असलेल्या कारभारामुळे महागाई आवाक्या बाहेर जात आहे. GSTचे कोणताही तर्क नाहीत गरिबांची बचत, खाद्य पदार्थ यावरही GSTआकारण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय भाव वाढीच्या नावाखाली पेट्रोल दरवाढ डिझेल, रासायनिक खतांची दरवाढ महागाईचा वाढता दर २४.३%पेक्षा वाढता बेरोजगारीचा दर या साऱ्या बाबीमुळे संपूर्ण देशातील जनता हवादील झालेली आहे . शेतकरी पासून तर व्यापाऱ्या पर्यंत गरीबा पासून उच्च पदस्त कर्मचारी या सर्वाना महागाईने होरपलेले आहे. सद्या देशातील सरकार श्रीमंतांचे सरकार असून देशाला गरिबीत ढकलत आहे. एवढेच नव्हेतर नवीनच महाराष्ट्रात आलेले आहे राज्य शासन हे भोंगळ कारभार करीत आहे . राज्यात ओला दुष्काळ जाहीर न करणे महाविकास आघाडीने घेतलेले निर्णय रद्द करणे विकास कामासाठी दिलेली निधी रद्द करणे असे गलथान कारभार कार्य शिंदे सरकार करीत आहे.

यावेळी “५० खोके, महागाई एकदम ओके” या अशा कारभारावर अंकुश लागावा, अशी अपेक्षा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वतीने करतो. तसेच महागाई लवकरात लवकर नियंत्रणात आणावी, अन्यथा राष्ट्रवादी युवकांच्या वतीने तीव्र आंदोलन घेण्यात येईल. असा ईशारा निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पाटील, यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, जिल्हा उपाध्यक्ष योगेश पाटील, राष्ट्रवादी युवक जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, राजू पाटील, राष्ट्रवादीचे समन्वयक किशोर माळी, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, विरावली विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन नरेंद्र सोनवणे पाटील, राहुल चौधरी, शाहरुख तडवी, पवन खरचे, हेमंत दांडेकर, सरदार तडवी, गिरीश शिरसागर, विजय भोई, अजय मोरे, लक्ष्मण बारेला, मन्साराम पाटील, ज्ञानेश्वर सोनवणे, बिस्मिल्ला तडवी, प्रशांत पाटील यासह असंख्य युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content