Home Cities जळगाव डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजमध्ये ‘तिचा गणपती’चे जल्लोषात स्वागत

डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेजमध्ये ‘तिचा गणपती’चे जल्लोषात स्वागत

0
51


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वूमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अप्लिकेशन जळगाव महाविद्यालयात “तिचा” गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले व प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

आज बुधवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके यांनी पूजा केली. महाविद्यालयाच्या बी.सी.ए च्या सर्व विद्यार्थ्यांनींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांनींनी क्राफ्ट पेपरचा वापर करून वेगवेगळी सजावट केली व बाप्पांचे चित्र काढून पोस्टर्स तयार केले आणि त्यांचा वापर सजावटीसाठी केला. त्यावर समाजासाठी संदेश लिहिलेले असून जनजागृती करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला आहे.

कार्यक्रमाचे कामकाज प्रा.वैजयंती असोदेकर यांनी केले. कोरोनानंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा जोश दिसून येत होता. या कार्यक्रमास डॉ. निलीमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound