Home Cities जळगाव विद्यापीठात करिअर कट्टा अंतर्गत संवाद बैठक

विद्यापीठात करिअर कट्टा अंतर्गत संवाद बैठक


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात करिअर कट्टा अंतर्गत शनिवार २७ ऑगस्ट रोजी संवाद बैठक घेण्यात आली.

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा सुरु करण्यात आला आहे. करिअर कट्टाच्या संवाद बैठकीत एम.आय.टी.एस.सी.चे अध्यक्ष श्री.यशवंत शितोळे हे अध्यक्षस्थानी होते तर व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. अनिल डोंगरे, बेंडाळे महाविद्यालयातील प्रा. जयेंद्र लेकूरवाळे यांची उपस्थिती होती. श्री. यशवंत शितोळे यांनी विद्यार्थांसाठी करिअर कट्टाव्दारे उपलब्ध कोर्सेस व मार्गदर्शनपर नामवंत अधिकारी व प्राध्यापकांच्या व्याख्यानांचे व्हिडीओ व इतर अपडेटस् सर्वांगीण विकासासाठी कसे कार्य करतात ते विशद केले. प्रा.लेकुरवाळे यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळणेसाठी कसे प्रयत्न करत आहेत ते सांगितले. या बैठकीत विद्यापीठ प्रशाळांमधील प्राध्यापक अॅम्बॅसेडर्स तसेच विद्यार्थी अॅम्बॅसेडर्स उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.मधुलिका सोनवणे यांनी केले तर आभार प्रा. सुनील अहिरे यांनी मानले.


Protected Content

Play sound