पाचोरा (प्रतिनिधी) शहरातील वॉर्ड क्र.९ मध्ये गाडगेबाबा नगर, भास्कर नगर, तक्षशिला नगर, कालिकामाता नगर, अष्टविनायक कॉलनी, शाहू नगर, तलाठी कॉलनी, गोविंद नागरी, भाग्यलक्ष्मी कॉलनी या भागात एल.ई.डी. लाईट बसवण्याच्या कामाला सुरुवात आज (दि.२०) नगरसेवक संजय ओंकार वाघ यांच्या हस्ते करण्यात आली.
या प्रसंगी भोला आप्पा चौधरी, पी.डी. भोसले, रणजीत पाटील, सतीश देशमुख यांच्यासह या वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.