यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे शेकडो वर्षाची परंपरा असलेला ‘पेहरन ए शरीफ’ उत्सव असंख्य भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला
येथील हिंदू मुस्लीम बांधवांचे श्रद्धास्थान असलेला ‘पेहरन-ए-शरीफ‘ उत्सव आज दि. १३ ऑगस्ट रोजी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा झाला. पाऊस कोसळत असतानादेखील सय्यदना गौसे आजम दस्तगीर याच्या पवित्र वस्त्राचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. या उत्सवाला सुमारे १३० वर्षांची परंपरा आहे. मागील दोन वर्षापासून कोरोना संसर्गाच्या काळात बंद असलेली मिरवणुक मोठया उत्साहाच्या वातावरणात काढण्यात आली. उर्दू वर्षानुसार मोहरमच्या १४ तारखेला हा उत्सव साजरा करतात. त्यात सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन म्हणजेच तब्बरूकचे ( पवित्र वस्त्र ) दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक हजेरी लावतात. यंदाच्या उत्सवाचे आयोजन बाबूजी पुरा उत्सव समितीने केले आहे.
शहरातील नजमोद्दीन अमीरोद्दीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक ( पवित्र वस्त्र ) असे म्हणतात. स्वातंत्र्यपूर्व काळापासून यावल येथे या पवित्र वस्त्राची सजवलेल्या डोलीतून वाद्याच्या गजरात धार्मिक गीत ( नाते पाक ) गात मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. या उत्सवात हिंदू-मुस्लिम बांधवही सहभागी होत असल्याने एकात्मतेचे दर्शन घडते. मिरवणुकीत नवस पूर्ण होतो. अशी भाविकांची धारणा आहे. जिल्ह्यासह मंबई, मालेगाव, बऱ्हाणपूर, सूरत, खंडवा येथील भाविक येतात. उत्सव समिती अध्यक्ष बासीत खान असलम खान, उपाध्यक्ष शेख मोहसीन शेख नय्यर, उपाध्यक्ष नदीम खान, साबीर खान, कार्याध्यक्ष कासीम खान नासीर खान, खजिनदार रमीज शेख बशीर, सचिव शारुख खान इब्राहिम खान, शाहिद खान, शरीफ खान, युनुस बिस्मिल्ला पिंजारी, कासीम खान, अकरम खान, अतीक खान, खालीद खान, शोएब खान, ईब्राहिम खान, मीनाज शेख ईकबाल, शेख तन्वीर शेख निजान आहेत. या
राज्यात प्रसिद्ध असलेल्या उत्सवासाठी यावलमध्ये यावल रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी, कॉंग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, यावलचे माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, भाजपाचे तालुका अध्यक्ष ऊमेश फगडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा मुकेश येवले, काँग्रेसचे युवा नेतृत्व धनंजय शिरीष चौधरी, अनिल जंजाळे, अमोल भिरड, शेख हकीम शेख याकुब शेख, अलताफ असमद, करीम चौधरी, उमर कच्छी, डॉ सलीम शेख, हाजी गफ्फर शाह, माजी नगराध्यक्ष अभिमन्यू चौधरी, ‘ माजी नगरसेवक समीर खान, मनोहर सोनवणे, अस्लम शेख नबी आदींनी जशने ए पहेहन शरीफ मिरवणुकीत सहभाग घेतला.
यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले, पोलीस उपनिरिक्षक सुदाम काकडे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त चोख पार पाडला.