Home Cities यावल मनोहर माधव सावकारे यांचे निधन

मनोहर माधव सावकारे यांचे निधन


0acbdcf2 09d1 45a2 ab80 a77916aa88d6
 

यावल (प्रतिनिधी) येथील रोहीदास नगरमधील रहिवाशी मनोहर माधव सावकारे (वय ५८ वर्ष) यांचे रविवारी मध्यरात्री ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन झाले आहे.

 

मनोहर सावकारे यांना गोदावरी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले होते. परंतू रात्री १२ वाजेच्या सुमारास निधन झाले. मनोहर सावकारे हे १९८३ पासुन यावल येथील कला वाणीज्य व विज्ञान महाविद्यालयात ग्रंथालय परिचारक म्हणून कार्यरत होते. मागील दोन महीण्यापूर्वीच त्यांच्या पत्नी यांचे देखील दिर्घ आजाराने निधन झाले होते. सावकारे यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा सून नातवंडे असा परिवार आहे. मनोहर सावकारे यांना सायकल स्पर्धेचा विशेष छंद होता. त्यांनी सायकल स्पर्धेत अनेक विजेतेपद देखील मिळवले होते. आज दिनांक २० मे रोजी सायंकाळी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound