बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-औरंगाबाद- नागपूर महामार्गावर डोनगावजवळ महामार्गाच्याकडेला काहींना सोसायटी कॉम्प्लेक्स ते मादणी फाट्या परिसरात रस्त्याच्या उजव्या बाजूने सोन्याचे मणी पडलेले नजरेसं पडले. ज्याला दिसले त्यांनी उचलण्यासाठी लगबग केली. यामुळे काही वेळ वाहतूक सुद्धा थांबलेली होती.
डोणगावमध्ये १० ऑगस्टला सकाळी ११ वाजता दरम्यान औरंगाबाद नागपूर राज्य महामार्गावर सोसायटी कॉम्प्लेक्स पासून ते मांदणी फाट्या पर्यंत मोटारसायकलस्वार, आजू बाजूचे दुकानदार, रस्त्याने जाणारे पदाचारी हे सोन्याच्या मण्यांचे लाभार्थी ठरले. जो तो मणी उचलून खिशात टाकून पुढचे मणी उचलण्याच्या नादात होता. यात कोणाला कोणाचा धक्का लागला तर कोणी कोणाला आवाज देऊन मणी उचलण्यासाठी सांगत होता. हा प्रकार सुमारे १५ ते २० मिनिटे चालला. सोन्याचे मणी सापडत आहेत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने त्रिगोनी परिसरातील बाया माणसे यांनी सुद्धा गर्दी केली. रस्त्याने जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांनी देखील गाडी थांबवून मणी वेचने सुरू केले. या धावपळीला पाहता काहीकाळ महामार्गावरील वाहतूक सुद्धा थांबलेली होती.
सोन्याचे मणी पाहून यावर मंथन सुरू झाले ? कोणी म्हणत की मोटारसायकल वरून महिला चालली असेल तिच्या गळयात असलेली एकदानी पोत तुटून पडली असेल. तर काहींनी चोरट्यानी पोलिसांच्या धाकाने कोणी सोन्याचे मणी फेकून दिले असतील असे विविध तर्क वितर्क लावत होते. मात्र काहींनी मणी फोडून पाहिल्यावर तो चापट न होता सरळ फुटून तुकडे तुकडे झाले. ज्याने सापडलेले मणी सोन्याचे नव्हते तर सोन्या सारखे दिसणारे नकली होते याची खात्री पटली जीवाचे हाल करून मणी वेचणाऱ्याना स्वतावरच हसू यायला लागलेलं होत. ज्यांनी ज्यांनी माणिवेचले त्यांनी अलगद बाजूला टाकून दिले कोणाला माहीत पडल्यावर ते आपल्यावर हसतील याची काळजी त्यांना वाटत होती. पण ते मणी कोणी व का फेकले असतील हा प्रश्न अनुत्तरित राहिला.