पाटणादेवी बोढरे वनक्षेत्रात आढळले अकरा बिबटे

0826e3ca 2c70 4570 b0ba 57d3fa4fd82c

 

चाळीसगाव (प्रतिनिधी) बुद्धपौर्णिमेच्या रात्री वन्यजीव विभागाने पाटणा व बोढरे वनक्षेत्रात केलेल्या प्राणी गणनेत 13 स्थळांच्या पाहणीतून विविध प्रकारचे वन्यजीव आढळून आले आहेत. त्यात अकरा बिबट्यांचा समावेश आहे.

 

18 19 मे या बुद्धपौर्णिमेच्या रात्रीत वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांना या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे वन्य प्राणी आढळून आले आहे. यात नर मादी व पिल्ले असे मिळून 11 बिबटे, 158 नीलगाय, 253 माकड, 18 ससे, 11 तडस, 428 रानडुक्कर, 4 कोल्हे, 38 काळवीट, 18 भेकर, 132 मोर, 10 लांडगे, 13 उदमांजर, 9 चिंकारा, 1 मुंगूस, असे वन्य प्राणी आढळून आले आहेत. बुद्ध पौर्णिमेच्या रात्री 13 स्थळांवरून 2 वनपाल 6 वनरक्षक 30 वनमजूर अशा वन कर्मचाऱ्यांनी ही मोजणी केली असल्याचे वन्यजीव विभागाचे अधिकारी चव्हाण यांनी सांगितले आहे.

Add Comment

Protected Content