Home क्राईम आंतरजातीय प्रेमविवाह करणार्‍या दाम्पत्याला मारहाण

आंतरजातीय प्रेमविवाह करणार्‍या दाम्पत्याला मारहाण

0
26

भुसावळ प्रतिनिधी । मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे तिच्यासह तिच्या पतीला बेदम मारहाण करणार्‍यांविरूध्द पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, भिरूड हॉस्पीटलमागील कृष्णा नगरातील रहिवासी असणार्‍या सौ. सोना नितीन कांडेलकर या युवतीने घरच्यांच्या मनाविरूध्द आंतरजातीय विवाह केला आहे. यामुळे तिच्या माहेरच्या मंडळीने आज दुपारी सोना आणि तिचा पती नितीन यांना मारहाण केली. यात गर्भवती असणार्‍या सोनालाही निर्दयपणे मारहाण करण्यात आली. या प्रकरणी सोना नितीन कांडलकर हिने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठेत पोलीस स्थानकात नवलसिंग मज्जूसिंग भाडिया (रा. हरदा, मध्यप्रदेश); बबलूसिंग दीपसिंग बावरा, दीपसिंग तेजसिंग बावरा, प्रदीपसिंग दरबारसिंग बाटीया, मंगलसिंग चंदासिंग छाबडा, अवतारसिंग दर्शनसिंग बाटीया, चंदनकौर मंगलसिंग छाबडा, छायाकौर प्रधानसिंग बावरा, कुलजीतसिंग मंगलसिंग बावरा, जर्नेलसिंग गुमानसिंग बावरा, प्रधानसिंग चरणसिंग बावरा, बलजीतसिंग तेजसिंग बावरा (सर्व रा. कृष्णानगर, भिरूड हॉस्पीटलमागे भुसावळ ) यांच्याविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या सर्व संशयीतांविरूध्द भाग ५, गुरन २८६, भादंवि कलम ३०७, ३५३, १४३, १४७, १४८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सपोनि सारिका खैरनार या करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound