Home क्राईम वादातून जावायाने सासऱ्याच्या डोक्यात घातला विळा

वादातून जावायाने सासऱ्याच्या डोक्यात घातला विळा

crime-2

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । सासऱ्याच्या घरी येवून पत्नीला आत्ताच्या आत्ता घरी चल सांगत वाद निर्माण झाल्याने जावायाने सासऱ्याच्या डोक्यात विळा मारून जखमी केल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून याबाबत रामानंद पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पतीच्या व्यसनांना रामसिंग मोतीराम चव्हाण यांची मुलगी पूजा राजेश चव्हाण रायसोनी नगरातून हरिविठ्ठल नगर येथे राहणारे मावासा उत्तम भिकारी राठोड यांच्याकडे आली. शनिवारी रात्री 2.30 वाजता पूजा हिचा पती राजेश खेमचंद चव्हाण रात्री दोन जणांना घेवून दुचाकीवरुन हरिविठ्ठल नगर येथे आला. याठिकाणी पत्नी पूजा हिस आत्ताच्या आत्ता घरी चल म्हणून दम भरला. तिने नकार दिल्यावर त्याने वाद घातला. हे सोडविण्यास गेलेल्या उत्तम राठोड यांच्या डोक्यात राजेश याने घरातील विळा मारला. व दोघांसह निघून गेला. जखमी राठोड यांना कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. याप्रकरणी उत्तम राठोड यांच्या फिर्यादीवरुन राजेश चव्हाण रा. रायसोनी नगर, देवा चव्हाण यांच्यासह एक अनोळखी अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस उपनिरिक्षक कांचन काळे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound