नाला खोलीकरणासाठी आमदार सावकारे यांचे श्रमदान

sawakare

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली नाला खोलीकरण व सिमेंट बंधाऱ्यातील गाळ उपसण्याचे काम श्रमदानातून आज रविवार रोजी करण्यात आले. यावेळी जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, जि.प. माजी सदस्य समाधान पवार, सरपंच रामलाल बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळी यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण अतिशय कमी होत आहे. त्यात नदी-नाल्यांमध्ये गाळ साचला आहे. त्यामुळे पाऊस पडला तरी हे पाणी वाहून जात असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोलवर गेली आहे. तरी जमिनीतील पाणी पातळी टिकून रहावी यासाठी आमदार सावकारे यांनी तालुक्यातील कुऱ्हे ( पानाचे), चोरवड येथे नाला खोलीकरण करणे व सिमेंट बंधाऱ्यातील गाळ उपसून पाणी जमिनीत जिरविण्यासाठी श्रमदानातून खोलीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आमदार सावकारे यांच्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. कुऱ्हे पानाचे येथे रविवार रोजी आमदार सावकारे यांनी रखरखत्या उन्हात उभे राहून परिसरातील दोन नाल्यांवर खोलीकरण करण्यासाठी उपस्थित राहिले. श्रमदानातून मोठ्या प्रमाणात हे काम करून घेतले.

यशस्वितेसाठी यांनी घेतले परीश्रम
या श्रमदानाच्या कार्यक्रमासाठी आमदार सावकारे व जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे या कुऱ्हे (पानाचे) येथे सकाळी 7 वाजताच बोदवड रोडवरील नाल्यावरील बांधावर उपस्थित झाले. स्वतः हातात टोपली घेऊन आमदार सावकारे यांनी प्रमाणात प्रारंभ केला. त्यानंतर या श्रमदानामध्ये जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, जिल्हा परिषद माजी सदस्य पवार, सरपंच बडगुजर, उपसरपंच वासू वराडे, माजी उपसरपंच रविंद्रा नागपुरे, ग्रा.पं. सदस्य नारायण कोळी, ग्रा.पं. सदस्य प्रवीण नागपुर, प्रमोद उंबरकर, सुरेश शिंदे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रमाकांत पाटील, बापु पाटील ग्रा.पं. सदस्या सुनंदाबाई वराडे, कल्पना पाटील, अन्नपूर्णा पारधे, कोकीळा पाटील, अनिल कुंभार, संजय पवार, धनराज पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले.

मोंढाळा रोड वरील नाल्या प्रमाणेच गावापासून जाणारा तेलखोरा पाझर तलावाच्या नाल्यात श्रमदानातून नाला खोलीकरण, सिमेंट बंधाऱ्यातील गाळ उपसण्याचे काम करण्यात आले. या कामामुळे यावर्षी पावसाळा चांगला झाल्यास नाला व बंधाऱ्यामध्ये पाणी साचून जमिनीत झिरपून त्याचा काही प्रमाणात ग्रामस्थांना फायदा होऊ शकतो, असे बोलले जात होते. दरम्यान, शनिवार रोजी आमदार संजय सावकारे यांनी शहरातील सांस्कृतिक फाउंडेशनच्यावतीने चोरवड नाला खोलीकरण उपक्रमात सहभाग घेतला.

Add Comment

Protected Content