Home Cities यावल चिंचोली येथील अभिषेकचे एमएस मध्ये यश

चिंचोली येथील अभिषेकचे एमएस मध्ये यश


yawal news

यावल ( प्रतिनिधी)। परदेशात जावुन आपल्या मुलाने उत्तुंग शिक्षण घ्यावे. व आपल्या आई वडीलांचे नाव लौकीक मिळवावे. हे प्रत्येक पालकांचे स्वप्न असते.व हे स्वप्न प्रत्यक्ष साकारले आहे. कल्याण येथील रहिवासी असलेले अनिल मधुकर बडगुजर यांचा मुलगा अभिषेक बडगुजर याने नुकतेच “द युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास, ऑर्लिगंटन (अमेरिका) येथे एमएस करून आपल्या समाजाचे नाव सात समुद्र पार नेले आहे. नुकताच टेक्सास युनिव्हर्सिटीच्या वतीने ऑर्लिंगंटन येथे कुलगुरूंच्याहस्ते अशा पाचशे स्नातकांना पदवीप्रधान समारंभात ही पदवी संपादित करण्यात आली. यात अभिषेकचा समावेश होता.

अभिषेक हा चिंचोली ता. यावल येथिल मधुकर दामु बडगुजर यांचा नातु तर सदाशिव बडगुजर व चिंचोली देशदुतचे पत्रकार नितिन बडगुजर यांचा पुतण्या आहे. त्याच्या या यशाबद्दल बडगुजर समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते वसई येथिल एकनाथ बडगुजर, दिपक बडगुजर, बाजीराव बडगुजर (धरणगाव), वासुदेव बडगुजर शिरसाड, श्रीराम बडगुजर कल्याण, महेन्द्र बडगुजर, सुमित बडगुजर, दिनेश बडगुजर धरणगाव, कुंदन बडगुजर पुणे, निखिल बडगुजर, चौधरी सर कल्याण, चिंचोली येथील भगवान बडगुजर, राकेश बडगुजर, स्वप्निल बडगुजर, ऋषिकेश बडगुजर, अरूण बडगुजर, वरूण बडगुजर वसई, यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound