लखनऊ (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशमधील चंदौली लोकसभा क्षेत्रातील तारा-जीवापूर गावात दलित वस्तीतील नागरिकांनी मतदान करु नये, यासाठी एक दिवस आगोदरच आपल्या बोटांवर भाजपा कार्यकर्त्यांनी बळजबरी शाई लावण्याचा आरोप केलाय. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळजनक उडाली असून प्रशासनाने चौकशी सुरु आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या चंदौली लोकसभा क्षेत्रात एक दिवस आगोदरच दलित मतदारांच्या बोटावर शाई लावण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्तीने शाई लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. शनिवारी सातव्या टप्प्यातील मतदानाच्या एक दिवस आधी तीन जण गावात आले. त्यांनी आमच्या बोटावर बळजबरी शाई लावली आणि आम्ही आम्ही मतदान करु नये यासाठी त्यांनी 500 रुपयेही दिले. ते तिघेही भाजपाचे कार्यकर्ते होते’ असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.