Home Cities अमळनेर विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा : सापडलेला मोबाईल केला परत

विद्यार्थ्याचा प्रामाणिकपणा : सापडलेला मोबाईल केला परत

0
138

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा आठवीचा विद्यार्थी प्रवीण बारेला या विद्यार्थ्याला परिसरात मोबाईल सापडला असून त्याने प्रामाणिकपणे शिक्षकाकडे आणून दिला.

स्वार्थी युगातही प्रामाणिकपणा शिल्लक आहे हे त्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले. तो मोबाईल कोणाचा? याची चौकशी केला असता, तो मोबाईल जेष्ठ शिक्षिका एस पी अहिरे मॅडम यांचा होता. या पार्श्वभूमीवर अहिरे मॅडम यांच्याकडून या विद्यार्थ्याला प्रामाणिकपणाबद्दल भेटवस्तू देण्यात आली. प्राचार्य पी.एम. कोळी सर व जेष्ठ शिक्षक आर जी जगताप सर यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करून सन्मानित केले. यावेळी उमेश काटे सरांनी सूत्रसंचालन केले. सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound