डोंबिवली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अलीकडेच डोंबिवलीतील शिवसेना शाखेवरून ठाकरे आणि शिंदे गटात राडा झाल्यानंतर अखेर दोन्ही गटांनी एकाच कार्यालयात आपापल्या स्वतंत्र शाखा सुरू केल्या आहेत.
शिवसेनेच्या डोंबिवली मध्यवर्ती शाखेवर ताबा मिळवण्यासाठी मंगळवारी शिंदे व ठाकरे समर्थक आपआपसात भिडले होते. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. तर हे प्रकरण पोलीस स्थानकात देखील गेले होते. यानंतर डोंबिवली मध्यवर्ती शाखेचे शिंदे व ठाकरे गटात विभाजन झाल्याचे पहायला मिळत आहे. ठाकरे समर्थकांनी ‘शाखा आमच्या बापाची’ असं म्हटल्यावर, ही शाखा शिवसेनेची आहे, कोणाच्या बापाची नाही, असं उत्तर शिंदे गटाकडून देण्यात आलं. अखेर, दोन खोल्यांवर शिंदे गटाने ताबा घेतला तर दोन खोल्या ठाकरे गटाने घेतल्या आहेत.
यामुळे आता डोंबिवली शाखा ही दोन गटांमध्ये विभाजीत झाली असून एकाच शाखेत दोन कार्यालये सुरू झाली आहेत.