पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिंदे गटातील ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर काल रात्री हल्ला करण्यात आला असून यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत.
काल रात्री उशीरा राज्याचे माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली असून यात वाहनाचा मागील बाजूचा काच फुटला आहे. सामंत हे तानाजी सावंत यांच्या घरून कात्रज येथे परत येत असतांना हा प्रकार घडला.
यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष उफाळून आला आहे. शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया देतांना हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. आक्रमक भाषणांमधून असे प्रकार घडत आहेत. आक्रमक भाषण करण्याचा उद्देश हाच असल्याचा आरोप त्यांनी केलाय. स्वत: उदय सामंत यांनी हा हल्ला सुपारी देऊन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तर काही शिवसैनिकांनी आपल्याला तानाजी सामंत यांच्यावर हल्ला करायचा होता अशी प्रतिक्रिया वाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलतांना दिली आहे.