कामगाराकडून मालकाची लाखो रूपयांची फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी येथील विजय ॲग्रो सेंटर या कंपनी मालकाची कंपनीतीलच गोडावून किपर कामगाराने तब्बल ४४ लाख ७३ हजार ६२८ रुपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात   गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील निसर्ग कॉलनी येथील रहिवासी नितीन जगदीश कुलकर्णी वय ४२ यांची एमआयडीसी येथील ३२ एक्स सेक्टरमध्ये विजय ॲग्रो सेंटर नावाने कंपनी आहे. कंपनीतील गोडावून किपर पंकज नितीन पाटील रा. जगवानी नगर, जळगाव याने जून २०२१ ते २९ एप्रिल २०२२ दरम्यान कंपनीचे बनावट फॉर्म तयार करुन ४४ लाख, ७३ हजार, ६२८ रुपये किंमतीच्या विविध विद्राव्य खते, बियाणे तसेच किटकनाशके या मालाचा अपहार केला. प्रकार समोर आल्यानंतर कंपनी मालक नितीन कुळकर्णी यांनी पंकज नितीन पाटील यांच्या विरोधात सोमवार, १ ऑगस्ट रोजी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहेत.

Protected Content