पाटणादेवी अभयारण्यात आज होणार प्राणी गणना

images 2

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाटणादेवी अभयारण्य हे विविध प्राणी व पक्षी त्यांच्या आश्रयासाठी प्रसिद्ध असून या वनक्षेत्रात अनेक प्रकारचे वन्य प्राणी आढळून येतात. अशाच या वन्यजीवांची आज येथे गणना केली जाणार आहे. संपूर्ण भारतभर वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्धपौर्णिमा याच दिवशी ही गणना होत असते.

 

पाटणादेवी अभयारण्याच्या रेंज क्षेत्रातील प्राण्यांचीही आज गणना केली जाणार असून वनक्षेत्रातील पाणवठे, असलेल्या १३ ठिकाणी ही गणना वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. यात दोन वनपाल सहा वनरक्षक व सुमारे ३० वनमजूर यांचा समावेश असेल, असे वन्यजीव विभागामार्फत सांगण्यात आले आहे. बुद्धपौर्णिमा या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जास्त जवळ येत असल्याने या रात्री चंद्रप्रकाश अत्यंत प्रखर असतो व कडक उन्हाळा असल्याने वनक्षेत्रातील ठराविक ठिकाणीच पाणी शिल्लक राहत असल्याने या दिवशी ही प्राणी गणना करणे सोयीचे होत असल्यामुळे देशभरात दरवर्षी याच दिवशी ही प्राणी गणना केली जात असते.

Add Comment

Protected Content