Home Cities धरणगाव धरणगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.रविंद्र एस. पाटील यांची निवड 

धरणगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड.रविंद्र एस. पाटील यांची निवड 

0
58


धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | येथील धरणगाव वकील संघाची नविन कार्यकारणीची निवडणुक नुकतीच धरणगाव न्यायालयात पार पडली असून अध्यक्षपदी ॲड.रविंद्र एस. पाटील यांची निवड करण्यात आली.

अध्यक्ष म्हणुन ॲड. रविंद्र एस. पाटील, तर सचिवपदी ॲड. गजानन बी.पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी ॲड. कैलास एन. मराठे यांची तर सहसचिवपदी ॲड. प्रशांत डी. क्षत्रिय यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सदर निवडणुक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वकिल संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. आर. एस. शिंदे, माजी अध्यक्ष ॲड. बी. के. आवारे, ॲड. राजेन्द्र येवले, ॲड. राहुल पारेख, ॲड. शरद माळी, ॲड. सी. झेड.कट्यारे, ॲड.एम.बी.शुक्ला,ॲड. संजय शुक्ला, ॲड.व्ही.एस.भोलाने, ॲड.डी.ए.माळी, ॲड.मनोज दवे, ॲड.महेंद्र चौधरी, ॲड.संदिप सुतारे, ॲड.विक्रम परिहार,ॲड.संदिप पाटील, ॲड.इस्राईल ॲड.आसिफ कादरी, ॲड.गिरीष कट्यारे ॲड.गणेश मांडगे,ॲड.आशिष बाचपाई, ॲड.विवेक पाटील, ॲड.कुलदीप चंदेल, ॲड. रिषभ शुक्ला, ॲड.प्रदिप पाटील, ॲड.एकनाथ पाटील तसेच ईतर सर्व नवोदित वकिल सदस्य यांनी निवडणुक प्रक्रिया उत्तमपणे राबवून पार पाडली व नविन कार्यकारणीला शुभेच्छा देत सत्कार केला.


Protected Content

Play sound