Home क्राईम नवीन बसस्थानक समोरून तरुणाची दुचाकी लांबवली

नवीन बसस्थानक समोरून तरुणाची दुचाकी लांबवली

0
105

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बस स्थानकाजवळ एकाची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील नवीन बसस्थानकाजवळ भूषण गुलाब कोळी (वय-३१) रा. चहार्डी ता. चोपडा ह. मु. दिनकर नगर, जळगाव हा तरुण मंगळवार २६ जुलै रोजी सकाळी १० वाजता दुचाकी (एमएच १९ डीयु ८९८३) ने आला होता. बसस्थानकाजवळ दुचाकी पार्क केली व कामानिमित्त निघून गेला.

दरम्यान, आज्ञात चोरट्यांनी ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर परिसरात दुचाकीचा शोध घेतला परंतु दुचाकी मिळाली नाही. अखेर गुरुवारी २८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक युनूस तडवी करीत आहे.


Protected Content

Play sound