जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पाचोरा रोडवर असलेल्या संजीवनी हॉस्पिटलसमोर राहणाऱ्या वृद्ध महिलेच्या ताब्यात असलेले १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुलोचना रमेशचंद्र जैन (वय-६८) रा. पाचोरा रोड, संजीवनी हॉस्पिटल समोर, जामनेर या महिला असताना 23 जुलै रोजी दुपारी तीन वाजता घरी एकटे संशयित आरोपी दीपक जैन रा. जळगाव हा महिलेशी बोलत असतांना तिच्या ताब्यातील १ लाख २ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरून नेले. याबाबत वृद्ध महिलेने तातडीने जामनेर पोलीस ठाण्यात घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित दीपक जैन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण शिंदे करीत आहे.