पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील भवानीनगर परिसरात राहणारे दाम्पत्याचे मागील वीस वर्षाच्या काळापासून एकदाही वीजबिल थकीत नाही. या आदर्श ग्राहकांचा वायरमन संदीप मराठे यांनी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.
पाचोरा शहरातील भवानीनगर परिसरात राहणारे परदेशी नामक दाम्पत्याची परिस्थिती अतिशय हालाखीची असतानादेखील आपण वापरलेल्या सेवेचा परिपूर्ण मोबदला द्यावा या हेतूने तब्बल वीस वर्षापासून एकदाही वीजबिल थकीत न ठेवता सतत भरत राहिले व कधीही आपल्या घराचा वीज पुरवठा खंडित होऊ दिला नाही. या गोष्टीचा आदर्श ठेवून परिसरातील वायरमन संदीप मराठे यांनी सदर ग्राहकांनी महावितरण कंपनीला तब्बल वीस वर्षापासून केलेल्या सहकार्याबाबत सत्कार केला असून याबाबत शहरात सर्वत्र परदेशी यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. अलीकडच्या काळात लाखो रुपये विज बिल स्थगित बाबत अनेक बातम्या आपण बघत असतो महावितरण कंपनीच्या वतीने अनेक ग्राहकांवर कारवाई देखील करण्यात येते, परंतु समाजातील काही दाम्पत्य असेदेखील आहेत की आपल्या प्रामाणिकपणा जपून ते जीवन जगत आहेत, सतत वीस वर्षापासून परदेशी दाम्पत्यानी केलेले सहकार्य हे कौतुकास्पद असून त्यांचे परिसरात सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्या अनुषंगाने वायरमन संदीप मराठे यांच्यावतीने तब्बल वीस वर्ष महावितरण कंपनीला सहकार्य केल्याबाबत सत्कार आणि सन्मान त्यांनी यावेळी केला आहे.