यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील भालोद येथे महावितरणच्या वतीने पर्यावरणाचे समतोल साधण्याच्या दृष्टी वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे ! या विचाराने विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी भालोद तालुका यावल येथे संपन्न झालेल्या कार्यक्रम 33/11 के. व्ही. भालोद कक्ष येथे महावितरणचे सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे यांच्या हस्ते विविध वृक्षांचे वृक्षरोपण करण्यात आले.
या प्रसंगी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता राकेश फिरके, सहाय्यक अभियंता कुंदन भंगाळे, पराग चौधरी , दिपक पाटील कनिष्ठ अभियंता व ऑपरेटर व कर्मचारी महेंद्र कोळी, विलास पाटील, महेश चौधरी, लाईनमन केतन पाटील, हितेश चौधरी, डिगंबर पाटील, सचिन चौधरी, गोविंद भास्कर,पुजा खोंडे,आकाश वारके, पवन सपकाळे, नयना इंगळे, राकेश नेमाडे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी महावितरणचे सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरखनाथ सपकाळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर विचार व्यक्त करतांना पर्यावरण व वृक्ष लागवडीचे महत्व सांगीतले.