मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । इंदोर-अमळनेर बस नर्मदा नदीत कोसळून १३ प्रवाशांता मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.
इंदोर-अमळनेर बस नर्मदा नदीत कोसळून १३ प्रवाशांता मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. दरम्यान बचावकार्य व्यवस्थित पार पाडावं व जखमींवर उपचारासाठी मध्यप्रदेशमधील जिल्हा प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवावा असे निर्देश त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क साधला आणि सहकार्यासाठी विनंती केली. यादरम्यान त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत देण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेसंदर्भात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसंच राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना देखील सूचना केल्या आहेतत. बचावलेल्या प्रवाशांना तातडीने आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मृतदेह बाहेर काढून योग्य शासकीय प्रक्रियेनंतर त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात देण्याच्याही सुचना मुख्यमंत्री यांनी विभागाला दिले आहे.